शनिवार, ४ एप्रिल, २००९

हे गजवदना!

प्रसाद शिरगांवकर हे सद्याच्या तरूण कवींमधील एक आघाडीचे नाव आहे. त्यांची "हे गजवदना" ही कविता मला खूप आवडली. योगायोग असा आहे की ह्या गीताला लावलेली चाल ही माझ्या आयुष्यातील पहिली-वहिली ध्वनीमुद्रित चाल आहे. एक छंद म्हणून मी कवितांना ह्या आधीही चाली लावलेल्या आहेत; पण ते सर्व केवळ मजेखातर होते. मग ही चाल का बरे ध्वनीमुद्रित केली? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना?(नाही,पडला नसेल तरी हरकत नाही. ;) ) तर ऐका.

माझे एक मित्र आहेत. ते एक उत्तम संगीतकार आहेत. विवेक काजरेकर असे त्यांचे नाव आहे. त्यांच्याशी संगीतावर(मुलगी नव्हे हो!:D ) चर्चा करताना त्यांनी मला ही कविता ऐकवली आणि म्हटले की सद्या ह्या गीताला चाल लावतोय पण सलग असा वेळ मिळत नाहीये. त्यामुळे काम अर्धवटच राहीलंय. गंमत म्हणून मी त्यांना म्हटले की, " द्या ती कविता मला. मी लावतो चाल त्याला. आहे काय आणि नाही काय?"
त्यांनीही गंमतीतच मला ती कविता दिली आणि मी लगेच तिला चाल लावली. पण त्यांना ऐकवणार कशी? मग त्यांनीच मला ती ध्वनीमुद्रित करायला सांगितले. त्यानंतर त्याचे रुपांतर मप३(एमपी३) मध्ये कसे करायचे हे देखिल सांगितले आणि मग मी त्याप्रमाणे करून माझ्याच आवाजात ती चाल ध्वनीमुद्रित करून त्यांच्याकडे पाठवली.यमन रागातली ही चाल त्यांना आवडली. पहिलीच चाल यमन सारख्या प्रसन्न रागाने झाली हा एक निव्वळ योगायोग आहे. असो. तर अशी ही माझ्या पहिल्या-वहिल्या गीताची चित्तरकथा आहे.




हीच चाल मुग्धा कारंजेकरने केवळ तानपुर्‍याच्या साथीने अतिशय सुरेलपणे सादर केलेय...ऐका. आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची उत्सुकता आहे. कृपया त्या व्यक्त कराव्यात अशी पुन्हा एकदा विनंती.

७ टिप्पण्या:

Nandan म्हणाले...

'श्रीगणेशा' सुरेख झाला आहे, काका. कविता आणि चाल दोन्ही मस्त.

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद नंदन!

raghav म्हणाले...

Chhan ! Tumhi marathi chitrapatansathi kaam karava .....tikde taent chi garaj ahe !

प्रमोद देव म्हणाले...

भलतंच!!! अरे रा्घवा, तिथे एकापेक्षा एक रथी-महारथी आहेत.
तरीही तुझ्या सदिच्छांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

विजयकुमार देशपांडे म्हणाले...

काव्य आणि गायन दोन्हीचा उत्तम मिलाफ !

Arun Saraf म्हणाले...

khoop chaan shabd, chaal aani gayan sudhaa

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद अरूणजी!